शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस असेल '' नॅनो पार्टी '' : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 19:52 IST

‘साहेबां’च्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी रहायला तयार नाही...

ठळक मुद्देबारामती विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ माळेगाव येथे सभा ...मुख्यमंत्र्यांना ‘त्या ’वादग्रस्त वक्तव्याची आठवणनिकाल सांगण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही

बारामती :   ‘‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले होते. यंदा २० चा आकडा देखील पार होणार नाही. लोकसभेतच राष्ट्रवादी काँग्रेस ‘नॅनो पार्टी’ झाली आहे. या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला ‘नॅनो पार्टी’ बनविणार आहे. ‘नॅनो’ मध्ये बसतात, तेवढीच लोक राष्ट्रवादीची निवडून येणार आहेत. २४ तारखेला निकालादिवशी पेटी उघडल्यावर घड्याळाला शॉक लागून त्याचे बारा वाजले पाहिजेत,’’ अशी टीका मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.बारामती विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ माळेगाव येथे ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, २१ तारखेला मतदान होणार असले तरी निकाल सांगण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. पाच वर्षांचे शेंबडे पोर सुद्धा महायुतीची सत्ता येणार असल्याचे सांगेल. ‘साहेबां’च्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी रहायला तयार नाही. ‘साहेब’ म्हणतात, मी पैलवान तयार करतो. मात्र, त्यांच्याकडे एकही पैलवान दिसत नाही. त्यांना स्वत:लाच फिरावे लागत असल्याचे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ४०० किलोमीटर पाईपलाईन करून पाणी आणले. हे पाणी वापरून त्यांनी कच्छच्या रणात शेती केली. पण, ५० वर्ष राज्य करून देखील पवारांनी या भागाला थेंबभर पाणी दिले नाही.   प्रत्येक वर्षी कृष्णा, कोयनेला पुर येतो. याबाबत परीसरात  सरकारने वर्ल्ड बँक व एशियन डेव्हलपमेंट बँक यांची २२ लोकांची ‘ग्लोबल एक्सपर्ट टीम ’  पाठवली. तसेच, वाहून जाणाºया पाण्याचा  अभ्यास केला. त्यानुसार  वाहून जाणाºया पाण्यावर कोणताही लवादामध्ये न अडकणारे पाणी आपल्याला वापरता येईल. आपल्याला कृष्णा-भीमा सारखी स्थिरीकरण योजना राबवून पाणी अडवून पुणे सोलापुर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वापरता येईल. जागतिक बँकेने त्यासाठी होकार दर्शविला आहे.  राज्यात सरकार आल्यावर बारामतीला टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, या परिसरात एकही टँकर दिसणार नाही. प्रत्येक शिवारात पाणी आणून दिले जाईल,असा दावा फडवणीस यांनी केला.भाजप सरकार सत्तेवर आल्यावर पवारसाहेब ''यांना '' शेतीतले काय कळते, असे म्हणायचे. वास्तविक ३१०० रुपयांच्या खाली साखर विकता येणार नाही, असा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला. त्यामुळे एफआरपी देणे शक्य झाले. माळेगावच्या कारखान्याने दिलेला दर तुम्ही का देऊ शकला नाही. इतके कारखाने घेतले, एकही कारखाना चालवू शकला नाही,असा सवाल फडवणीस यांनी केला.राष्ट्रवादीचे नेते सांगतात आम्हाला ईडीची नोटीस आली आहे. आम्हाला जाणीवपुर्वक फसविले जात आहे.  राज्य सहकारी बँकेच्या घोट्या संदर्भात उपलब्ध ‘ऑडिट रिपोर्ट‘ पहा. त्यानंतर अंधेर नगरी चौपट राजा, असे चित्र लक्षात येईल. आपलाच माल आहे,असे समजुन तो वाटण्याचे काम करत बँकेला बुडविण्याचे काम त्यांनी केले.  शेतकऱ्यांचे कारखाने जाणीवपूर्वक ‘लॉस’ मध्ये आणून ते कारखाने विकत घ्यायचे. त्यानंतर सरकारची थकीत देणी रद्द करून ते कारखाने कवडीमोल भावाने विकत घ्यायचे,असे अनेक कारखाने ‘पवारसाहेबां’च्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले. त्याच्याच बद्दल याचिका दाखल झाली. यावेळी कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केल्या.‘अजितदादा’ सुप्रीम कोर्टात गेले.  त्यामुळे   गुन्हा दाखल करा,असे सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल  झाला. त्याच्यावर ईडीची चौकशी सुरु झाली. दादांनी तत्काळ राजीनामा दिला. सकाळी राजीनामा दिला संध्याकाळपर्यंत तो संपला. दुसºया दिवशी साहेबांशी बोलल्यानंतर पुन्हा ‘दादा’ निवडणुक लढण्यास तयार झाले. हे असे घरी बसणार नाही. त्यांना तुम्हाला घरी बसवावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, रंजन तावरे, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, प्रशांत सातव, कुलभूषण कोकरे, वैष्णवी कोकरे, संदीप चोपडे, राजेंद्र काळे ,अ‍ॅड अमोल सातकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. -----------...मुख्यमंत्र्यांना ‘त्या ’वादग्रस्त वक्तव्याची आठवण५० वर्षांपासून बारामतीची सत्ता असून देखील त्यांना दुष्काळी भागात थेंबभर पाणी देता आले नाही. बरे झाले त्यांनी अजित पवारांना पाणी मागितले नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या ‘त्या’ वादग्रस्त’वक्तव्याची आठवण काढली. ------------------

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-acबारामतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवार