शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 04:55 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- पोपट पवारकोल्हापूर : ‘उसाशिवाय साखरेला अन् साखरेशिवाय राजकारणाला गोडवा येत नाही’ या म्हणीचा प्रत्यय सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या फडातच दिसून आला आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल १०० हून अधिक साखर कारखानदार विधानसभेच्या रणांगणात आपले नशीब आजमावत असल्याने त्यांची ही राजकीय आखाड्यातील साखरपेरणी फळाला येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारीतून राजकारण अन् राजकारणातून सत्ता हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या साखर सम्राटांना सर्वच पक्षांनी पायघड्या अंथरल्याने सहकार चळवळीचा आत्मा ठरलेली साखर कारखानदारी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारांपासून काहीसे दूर असणाºया भाजपने यंदा २८ साखर कारखानदारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. तर स्थापनेपासूनच सहकारी तत्त्वाचा अजेंडा घेऊन वावरणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने साखर कारखान्यांशी संबंधित असणाºया ३० जणांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेकडून यंदा १५ साखर कारखानदार रिंगणात उतरले असून, काँग्रेसनेही १२ साखर कारखानदारांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जवळजवळ ११ साखर सम्राटांना अपक्ष म्हणून रिंगणात उडी घ्यावी लागली आहे. दरम्यान राहुरी, कागल, माजलगाव, कोपरगाव, करमाळा, पंढरपूर, वाई, पाटण, करवीर, इस्लामपूर यांसह ११ विधानसभा मतदारसंघात साखर कारखानदारांमध्येच थेट लढत होत असल्याने या मतदारसंघाकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ५४ जणकृष्णा, भीमा, कोयना, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या मुबलक पाण्याने सुबत्ता आलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुळे राजकारणाशी घट्ट जोडली गेली आहेत. परिणामी, साखर कारखानदारांना वगळून राजकीय मैदान मारणे कोणत्याच पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही साखर कारखानदारीशी संबंधित पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ५४ उमेदवार विधानसभा निवडणुकीचा फड गाजवित आहेत.मराठवाड्यातही 22 जणांना उमेदवारीपाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मराठवाड्यातल्या काही भागातही साखर कारखान्यांभोवतीच राजकारण केंद्रित झाले आहे. त्यामुळे तेथील आठ जिल्ह्यांतील २२ साखर कारखानदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.प्रमुख उमेदवार आणि त्यांचे साखर कारखाने- पंकजा मुंडे :वैजनाथ सहकारी,परळी (भाजप)- अशोक चव्हाण : भाऊराव चव्हाण कारखाना, नांदेड (काँग्रेस)- राधाकृष्ण विखे : विठ्ठलराव विखे-पाटील कारखाना, प्रवरानगर(भाजप)- बाळासाहेब थोरात :भाऊसाहेब थोरात कारखाना, संगमनेर (काँग्रेस)- अजित पवार : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (राष्ट्रवादी)- हसन मुश्रीफ : संताजी घोरपडे कारखाना, कागल (राष्ट्रवादी)- अमित देशमुख : विकास सहकारी, लातूर (काँग्रेस)- सुधाकरपंत परिचारक :पांडुरंग कारखाना, श्रीपूर (भाजप)- अतुल भोसले : यशवंतराव मोहिते कारखाना, कºहाड (भाजप)- विश्वजित कदम :सोनहिरा कारखाना,पलूस-कडेगाव (काँग्रेस)- शंभूराज देसाई : बाळासाहेब देसाई सहकारी साखरकारखाना, पाटण (शिवसेना)- सुभाष देशमुख : लोकमंगल साखर कारखाना, सोलापूर (भाजप)- संदिपान भुमरे : संतएकनाथ सहकारी कारखाना, पैठण (शिवसेना)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019