शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

Maharashtra Election 2019: कल्याण डोंबिवलीसाठीचं साडेसहा हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे?; राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 21:51 IST

विविध मुद्द्यांवरुन भाजपा, शिवसेना सरकारचा समाचार

कल्याण: महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीला साडेसहा हजार कोटींचं पॅकेज देऊ म्हणाले होते. त्या पॅकेजचं पुढे काय झालं? ते पैसे गेले कुठे? असे प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कल्याणमधील सभेत उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे धापाच असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी राज यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवस्मारक या मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार टीका केली. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारण्याची टूम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनं काढली होती. यानंतर राज्यात भाजपा, शिवसेनेचं सरकार आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे समुद्रात गेले. त्यांनी पाण्यात काहीतरी टाकलं आणि म्हणाले स्मारक इथे होणार. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? ज्या ठिकाणी जलपूजन झालं, ती जागा आता मोदी, फडणवीस आणि उद्धव यांच्यातला एक जण तरी दाखवू शकतो का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनवरुन मागवला. मग आता महाराजांच्या स्मारकासाठी शिल्पकारदेखील चीनमधूनच मागवणार का, अशा प्रश्न राज यांनी विचारला. कलम ३७० चा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शहांनादेथील राज यांनी लक्ष्य केलं. कलम ३७० रद्द केल्याबद्दल अभिनंदन. आता काश्मीरमधील परिस्थिती सुधारा, असं राज म्हणाले. पण काश्मीरमधून रद्द केलेल्या कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण शहा त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. शहा ज्यावेळी कलम ३७० वर बोलत होते, त्याचवेळी त्याच भागात एका शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. पण मुख्य विषयांवरुन लोकांचं लक्ष विचलित करायचं काम भाजपाकडून सुरू आहे. त्यासाठीच कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे