शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंनी भाषणात सांगितलेली 'ती' घटना नेमकी काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 17:55 IST

राज ठाकरेंनी कल्याण, भिवंडीतील सभेत सांगितली घटना

मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरेंनी काल भिवंडी, कल्याणमध्ये प्रचारसभा घेत भाजपा, शिवसेना सरकारला लक्ष्य केलं. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी या प्रश्नांवरुन त्यांनी सरकारवर तोफ डागली. तुम्ही शांत राहता. तुम्हाला चीडच येत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. त्यामुळे तुमचा संताप मतपेटीतून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी उपस्थितांना केला.मला अन्याय सहन करून थंड बसणाऱ्या माणसांचं नेतृत्व करायला आवडत नाही. त्यामुळे अन्यायाविरुद्ध पेटून उठा, असं राज ठाकरे प्रचारसभेतील भाषणात म्हणाले. यावेळी राज यांनी राज्यातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवर भाष्य करताना मेक्सिकोत नुकत्याच झालेल्या एका घटनेचा संदर्भ दिला. मेक्सिकोत रस्ते दुरुस्तीचं आश्वासन न पाळणाऱ्या एका महापौराला स्थानिकांनी गाडीला बांधून फरफटत नेलं, असं राज यांनी सांगितलं. नेमकं काय घडलं होतं मेक्सिकोत?गेल्या आठवड्यात मेक्सिकोच्या महापौरांना स्थानिकांनी गाडीला बांधून फरफटवलं. या प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केली. रस्ते खराब असल्यानं ग्रामस्थांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढून एका पिकअप ट्रकला बांधलं आणि रस्त्यावरुन फरफटत नेलं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत महापौराची सुटका केली. 

महापौर जॉर्ज लुईस इस्कॅन्डॉन हेर्नानडेझ यांनी ग्रामस्थांना रस्ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र वारंवार वचनाची आठवण करुन देऊनही त्यांनी रस्ते दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी हेर्नानडेझ यांना कार्यालयातून बाहेर काढलं. यानंतर त्यांना पिकअप ट्रकला बांधून फरफटवण्यात आलं. या घटनेनंतर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. याआधीही आश्वासनं पूर्ण न केल्यानं हेर्नानडेझ यांच्यावर स्थानिकांनी हल्ला केला होता. 

हेर्नानडेझ यांच्यावरील हल्ल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामध्ये काही जण त्यांना इमारतीमधून बाहेर खेचून आणून गाडीला बांधताना दिसत होते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला. त्यामध्ये गाडीच्या मागे फरफटत जाणारे हेर्नानडेझ दिसत होते. या प्रकरणी आपण अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं हेर्नानडेझ यांनी सांगितलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे