शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

महाराष्ट्र निवडणूक २०१९: स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा; काँग्रेसची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 6:33 PM

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. निवडणूक निकालांचे विविध चॅनेल्सवर आलेले एक्झिट पोलवरुन राज्यात पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. महायुतीला २०० च्यावर जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र या वातावरणात ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते अशी जनभावना असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी, आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशीही काँग्रेसकडून ईव्हीएमबाबत विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले होते. अचलपूर - १, ऐरोली - १, अकोला पूर्व - १, अकोला पश्चिम -६, अकोट -३, आंबेगाव - १, अमरावती -४, अंधेरी पश्चिम -१, अणुशक्तीनगर - १, औरंगाबाद -१३, औसा - १, बाळापूर - ३, भोकर - ५, बोरिवली - १, बुलढाणा - २, भायखळा - १, चांदिवली - ३, चंद्रपूर - ४, चिखली - १, चिमूर -१, चोपडा -१, कुलाबा -१, धुळे शहर - १, दिंडोशी -३, गडचिरोली - १, घाटकोपर - २, गोरेगाव - २, कोल्हापूर उत्तर - ६, कोल्हापूर दक्षिण -२, कर्जत जामखेड - ३, जालना -४, हिंगणघाट -२, जामनेर -१, जोगेश्वरी पूर्व - २, कराड उत्तर - १, कसबा पेठ - २, करवीर -१, खामगाव -२, किणवट -१, कोपरी पाचपाखाडी -१, कुर्ला १ अशा प्रकारे राज्यभरात ईव्हीएमबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग