शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 14:13 IST

मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीला २०० च्या वर जागा मिळणार असा अंदाज आहे. मात्र शिवसेना-भाजपा यांना राज्यात बंडखोरीचा सामना करावा लागला. बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, महायुतीला २०० च्या वर जागा मिळतील असं भाजपाने याआधीच सांगितले होते. एक्झिट पोलचे आकडेही तसे सांगत आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. मात्र काही ठिकाणी राज्यात बंडखोरीचा फटका बसला नसता तर आणखी जागांमध्ये वाढ झाली असती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याठिकाणी बंडखोर उभे आहे त्याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटले असणार, बंडखोरांवर कारवाई होणं गरजेचे होते. अन्य ठिकाणी शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई केली आहे. मात्र मुक्ताई नगरमध्ये कारवाई करण्यात आली नाही. तरीही रोहिणी खडसे १५ हजार मताधिक्याने निवडून येणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले. 

राज्यातील विविध चॅनेल्सने दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला १२०-१४० जागा तर शिवसेनेला ८०-१०० जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. तर विरोधकांना अवघ्या ४०-६० जागा जिंकता येतील असं सांगितले आहे. राज्यातील वातावरण महायुतीच्या बाजूने असल्याचं कल एक्झिट पोलमध्ये दिला आहे. मात्र प्रत्यक्ष निकालात काय होतं यासाठी २४ तारखेची वाट पाहावी लागणार आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ तर शिवसेनेने १२४ जागा लढविल्या आहेत. तर कणकवली, माण या मतदारसंघात शिवसेना-भाजपा एकमेकांसमोर निवडणुका लढवित आहे. त्यामुळे या दोन जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. महायुतीत शिवसेना किती जागा मिळविणार यावर राज्याचं पुढील राजकारण अवलंबून आहे. आमचं ठरलंय असं म्हणत समसमान फॉर्म्युल्यावर शिवसेना निवडणुकीपूर्वी ठाम होती. मात्र काही तडजोडी करुन पुन्हा युतीत निवडणूक लढविली. राज्यात शिवसेनेचा मुख्यमत्री बसविणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या बंडखोरांवर शिवसेनेने जाणीवपूर्वक कारवाई केली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

महत्वाच्या बातम्या 

भाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा दावा 

'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'

मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार 'दिवाळी गिफ्ट'? आज होणार निर्णय

काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे