शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 22:11 IST

नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपाला काँग्रेसचा सवाल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सत्ता स्थापन न झाल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र यानंतर महायुतीमधील दोन मोठे पक्ष असलेल्या शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपांवरुन निर्माण झालेला संघर्ष टोकाला गेला. अखेर कोणत्याही पक्षानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा न केल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी केल्यानं महायुतीमधील दरी रुंदावली. शिवसेना भाजपापासून दूर गेल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. यानंतर भाजपानं सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केलं. ही घोषणा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन काँग्रेसनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  भाजपाला आजच नैतिकता आठवली का, असा प्रश्न काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. जगताप यांनी एक ट्विट करत भाजपानं याआधी अनेक राज्यांमध्ये कमी जागा जिंकूनही सत्ता स्थापन केली होती, याची आठवण करुन दिली आहे. ‘गोव्यात काँग्रेसला १७, भाजपाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८, भाजपाला २१, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला ८०, संयुक्त जनता दलाला ७१, भाजपाला ५३, मेघालयात काँग्रेसला २१, एनपीपी १९, भाजपाला २ जागा मिळाल्या होत्या. मात्र या सगळ्या राज्यांमध्ये भाजपानं सत्ता स्थापन केली. त्यावेळी भाजपानं नैतिकता गुंडाळून ठेवली होती का? जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर युती करताना लाज भाजून खाल्ली होती की तळून?,’ असे प्रश्न जगताप यांनी विचारले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस