शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:36 IST

राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे,

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. केंद्रातील भाजप सरकार अडवणुकीची भूमिका घेत आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. सरकार बनवण्याचे कोणतेही पर्याय न शोधता राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेणे हा कुटील डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता, पण बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र जाऊ शकत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सत्तेत जायचे की नाही? कशा पद्धतीने पुढे जायचे? यावर आमचे नेते चर्चा करीत आहेत.यासाठी किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवर आधी काँग्रेसच्या नेत्यांची आपसात चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. चर्चेअंती आम्ही कोणत्यातरी निष्कर्षाप्रत येऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले.मंगळवारी मुंबईत अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय चर्चा झाल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही, असेही अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.>समान मुद्द्यांवर अगोदर चर्चागेल्या कित्येक वर्षांनंतर माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. पहिलीच भेट असल्यामुळे फार काही व्यापक चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीतून तूर्त कुठलाही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे त्यांंनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना निवडणुकीसाठी एकच जाहीरनामा होता, पण शिवसेनेचा जाहीरनामा वेगळा होता. दोघांच्याही जाहीरमान्यातील समान मुद्दे कोणते असतील यावर आधी आमची चर्चा होईल. त्यानुसार समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर पुढील बोलणी होऊ शकते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे