शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भाऊ आहे मोठा खर्चाला नाही तोटा म्हणणे पडणार महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 07:00 IST

निवडणूकांचे बिगुल वाजले की, उमेदवारांकडून प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो..

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा : विविध गोष्टींकरिता दरपत्रक केले जाहीर

पुणे : निवडणूकांचे बिगुल वाजले की, उमेदवारांकडून प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो. मतदारांना पैशांचे, वेगवेगळ्या वस्तुंचे अमिष दाखवून आपल्या बाजुने मतदान करण्याकरिता उमेदवार प्रयत्नशील असतात. अशाप्रकारच्या खर्चावर नियंत्रण यावे यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर बंधने आणली आहेत. त्यांना प्रचाराकरिता २८ लाख रुपयांची मयार्दा आखून दिली आहे. या नियमांना डावलून खर्च करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने जेवण, नाष्टा, चहासह विविध खचार्चे दरपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यात एकूण 190 विविध गोष्टींकडे उमेदवारांचे लक्ष वेधले असून प्रशासनाने जाहीर केलेल्या दरानुसारच उमेदवाराला खर्च करावा लागणार आहे. यानुसार उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या शाकाहारी जेवणासाठी ७० रुपये, मांसाहारी जेवणासाठी १४० रुपये, पोहे, उपीटसाठी १० रुपये, साबुदाणा खिचडी १५ रुपये, चहा ४ रुपये, कॉफी - ५ रुपये, तर वडापावसाठी १२ रुपये मोजावे लागणार आहेत. निवडणूक जिंकण्याच्या अट्टहासापोटी पैशाचा महापूर वाहू नये आणि वारेमाप खर्चावर नियंत्रण रहावे, या हेतूने निवडणूक आयोगाने खचार्ची मयार्दा आखून दिली आहे. खर्चाच्या या मयार्देचे पालन होते की नाही, यावर निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. आयकर विभाग, खर्च नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, उमेदवारांच्या सभा, रॅलीसाठी लागणारे साहित्याची किंमत निश्चित करण्यात आली आहे. प्रचार फेऱ्यांपूर्वी फटाके वाजविल्यास त्याचेही दर नमूद करण्यात आले आहेत. प्रचार कार्यालयात वापरल्या जाणा-या वस्तू, बॅनर-पोस्टर यांचेही दर ठरविण्यात आले असून, उमेदवाराने दाखविलेल्या खचार्सोबत त्याची पडताळणी केली जाणार आहे......* उमेदवारांनो दरपत्रक पाहिले का...? 

जेवणशाकाहारी जेवण - ७० रुपयेमांसाहारी जेवण - १४० रुपयेफूड पॅकेट - पाच पुरी, सुकी भाजी, लोणचे, चटणी - २५ रुपयेएक लीटर पाण्याची बाटली - १० रुपयेबिस्कीटे - ५ रुपये.......प्रचार सभाकापडी मंडप पत्रा शेडसह - प्रति चौरस मीटर - २१० रुपयेकापडी मंडप साधा - प्रति चौरस मीटर - ११० रुपयेफायबर, प्लास्टिक खुर्च्या - प्रति नग - ८ रुपयेकापडी सतरंजी - प्रति नग - ५५ रुपयेसाउंड सिस्टीम सेट - प्रति नग - ३९२५टेबल फॅन - ३००.....फटाके (प्रति नग)एक हजाराची माळ - १५० रुपयेपाच हजाराची माळ - ७५० रुपये.....अन्य वस्तू (प्रति नग)साधे फेटे - १५० रुपयेगांधी टोपी - १५ रुपयेशाल - १०० रुपयेपुणेरी पगडी - ३५० रुपये.....  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणfoodअन्नElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग