शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत ४ हजार कोटी खर्च होणार!

By अतुल कुलकर्णी | Updated: October 9, 2019 04:37 IST

सरकारी यंत्रणेवर होणारा सुमारे ७०० ते आठशे कोटी रुपयांचा खर्च वेगळाच.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभेच्या २८८ जागांसाठी ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रत्येक उमेदवाराला अधिकृतपणे २८ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. एकूण उमेदवार आणि खर्च लक्षात घेतला तर या निवडणुकीत अवघ्या १५ दिवसात तब्बल ९०६ कोटी ९२ लाख रुपये खर्च होतील. या शिवाय, बेहिशेबी सरासरी १ कोटी धरले तर सुमारे ४ हजार कोटी खर्च होतील. सरकारी यंत्रणेवर होणारा सुमारे ७०० ते आठशे कोटी रुपयांचा खर्च वेगळाच.निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने खर्चावर मर्यादा आणली असली तरी त्यातून पळवाट काढली जाते. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगल्या सोसायटीमधल्या मतदारांनी आमच्या सोसायटीला रंग लावून द्या इथपासून ते आमच्या सोसायटीचे पाच वर्षाचे केबलचे बील भरा, अशा मागण्या केल्याचे त्यावेळी समोर होते. निवडणूक काळात कोट्यवधी रुपये पकडले जातात. एका मतदारसंघात काही उमेदवार सुमारे २ कोटी ते ८ कोटी रुपये खर्च करतात. मात्र किमान १ कोटीचा खर्च एका उमेदवाराने केला असे गृहीत धरले तरीही ३२३९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. राजकीय पक्षांना खर्चाचे कसलेही बंधन नाही. उमेदवारांना त्यांचा खर्च त्यांच्या विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो तर राजकीय पक्षांना त्यांचा खर्च केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सादर करावा लागतो. त्या खर्चावर बंधन नसल्यामुळे राजकीय पक्षांचे विमान प्रवास, मोठ्या नेत्यांच्या व्यासपीठासाठीची स्टेज व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यासाठीचे खर्च उमेदवारांकडे नसतात. ते खर्च पक्षाच्या खात्यात जातात.या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या वतीने जवळपास १७ ते १९ हेलिकॉप्टर आणि १३ ते १४ विमाने वापरली जाणार आहेत. एका व्हीआयपी हेलिकॉप्टरचा खर्च दोन कोटींच्या आसपास येतो तर विमानाचा खर्च अडीच कोटीच्या घरात जातो. हा हिशोब पाहिला तर या हवाई प्रवासावर ५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. शिवाय प्रचारासाठी वापरल्या जाणाºया गाड्या, त्यांचे पेट्रोल, डिझेल हा सगळा खर्च गृहीत धरला तर तोही जवळपास तेवढाच होईल.भारतात राजकीय प्रचारासाठी हवाई वाहने वापराची पद्धत जास्त आहे. गेल्यावेळीपेक्षा यावेळी मागणी कमी आहे. दिवसाला पाच, सहा रॅलीज असल्या तर ही गरज वाढते. पण तशी मागणी अजून तरी दिसत नाही.- मंदार भारदे, एमडी,मॅब एव्हीएशन

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र