अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व

By Admin | Updated: January 15, 2017 17:50 IST2017-01-15T17:50:50+5:302017-01-15T17:50:50+5:30

मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. महिला गटात नाशिकच्या अनुभवी मोनिका आथरेने

Maharashtra dominates in half-marathon | अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व

अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व

महेश चेमटे/ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 15 -  मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. महिला गटात नाशिकच्या अनुभवी मोनिका आथरेने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोल्हापूरच्या मिनाक्षी पाटीलने रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या अनुराधा सिंगला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तामिळानाडूच्या जी.लक्ष्मणनने आपल्या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये सुवर्ण कमाई करताना बाजी पुरुष गटात मारली मारली. तर सचिन पाटील आणि गतविजेता दिपक कुंभार या कोल्हापूरच्या धावपटूंनी रौप्य व कांस्य मिळवले.
भिलाई येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रॉसकन्ट्री स्पर्धेमुळे यंदा अर्धमॅरेथॉनला कमी प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. महिलांमध्ये १० किमी अंतरानंतर मिनाक्षीने आघाडी घेतली. मात्र शेवटच्या टप्प्यात अनुभवी मोनिकाने निर्णायक आघाडी घेत १ तास १९ मिनिटे १३ सेंकद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले. तर मिनाक्षीने १ तास २० मिनिटे ५३ सेंकदात रौप्यपदक मिळवले. उत्तरप्रदेशच्या (लखनऊ) अनुराधाने १ तास २५ मिनिटे २० सेंकद वेळेसह कांस्य जिंकले.
पुरुषांमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या घ्लक्ष्मणनने १ तास ५ मिनिटे ५ सेंकदाची वेळ नोंदवत सुवर्ण निश्चित केले. तर, यानंतर द्वितीय क्रमांकासाठी सचिन आणि दिपक यांच्यात कडवी स्पर्धा रंगली. १० किमी अंतर दोघांनीही एकाच वेळेत पूर्ण केली. मात्र अंतिम रेषा नजरेत येताच सचिनने वेग वाढवताना सचिनने १ तास ६ मिनिटे २२ सेंकद वेळेसह रौप्य पदक पटकावले. तर गतविजेता दिपक कुंभारला १ तास ६ मिनिटे २८ सेंकद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 पायलटची मदत...
गतविजेत्या दीपक कुंभारचे तिसरे स्थान यंदाचा अनपेक्षित निकाल ठरला. मात्र, सचिनला धावताना पायलटची मदत झाली. नाहीतर माझे दुसरे स्थान नक्कीच हुकले नसते अशा शब्दांत दीपकने आपली निराशा व्यक्त केली.
याबाबत दीपक म्हणाला, ह्यशर्यतीत ५ किमी आणि १० किमी मी आणि सचिन बरोबरीत होतो. १२ किमीनंतर मी आघाडी घेतली. आघाडीरील धावपटूचा पायलट सचिनच्या परिचयाचा असल्याने तो त्याच्या बरोबर राहिला. याचा फायदा घेत सचिनने अखेरची ४ किमी बाकी असताना मला गाठून अखेरची ५०० मीटर बाकी असताना आघाडी घेत रौप्यपदक मिळवले. तो पायलट नसता तर रौप्यपदकाचा निकाल वेगळा लागला असता. 
 त्या  पायलट विषयी अर्धमॅरेथॉनचे प्रमुख होमियार मेस्त्री म्हणाले की, ह्यसर्व नियमांनुसार झाले. आघाडीच्या धावपटूंच्या आसपास अधिकृत पायलट असतो. तो पायलट अधिकृत होता आणि त्याला सुचना देण्यात आल्या होत्या. मुळात धावण्याचा मार्ग मोठा होता. त्यामुळे यात काहीच आश्चर्य नाही. 
तर, सचिन याबाबत म्हणाला, ह्यगेली ९ वर्षे मी मुंबईत सराव करतो. त्यामुळे मुंबईतील बहुतांशी धावपटू, प्रशिक्षकांशी ओळख आहे. मला कोणाचीही मदत झाली नसून मोक्याच्यावेळी कामगिरी उंचावून बाजी मारली.ह्ण
 
मॅरेथॉनमध्ये यंदाचे सहावे पदक आहे. दिल्ली मॅरेथॉन विजयी वेळेत पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला. त्यानंतर भोपाळ, हैद्रराबाद, वसई-विरार, कोलकातामध्ये कामगिरी उंचावली. यंदाची अर्धमॅरेथॉन ही माझी शेवटची अर्धमॅरेथॉन असून यापुढे मी ४२ किमीसाठी धावेल. २६ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली मॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदवत वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पात्रता मिळवण्याचे लक्ष्य आहे.
- मोनिका आथरे, विजेती - अर्धमॅरेथॉन
 
२०१२ पासून आजपर्यंत एकाही अर्धमॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक सोडला नाही. त्यामुळे येथेही आत्मविश्वासाने सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात येथे विजयी झाल्याचा आनंद आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर लष्करात दाखल झाल्याने कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली.
- जी.लक्ष्मणन, विजेता - अर्धमॅरेथॉन

Web Title: Maharashtra dominates in half-marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.