चित्रनगरीत महाराष्ट्र ‘दीन’च!
By Admin | Updated: April 30, 2016 02:16 IST2016-04-30T02:16:33+5:302016-04-30T02:16:33+5:30
गोरेगाव येथील फिल्मसिटी (दादासाहेब फाळके चित्रनगरी) कर्मचाऱ्यांना १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली

चित्रनगरीत महाराष्ट्र ‘दीन’च!
मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटी (दादासाहेब फाळके चित्रनगरी) कर्मचाऱ्यांना १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याविषयी चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी ही परवानगी नाकारल्याने कामगारांच्या पदरी उपेक्षाच आली.
२२ एप्रिल रोजी रयतराज कामगार संघटनेने फिल्मसिटी व्यवस्थापनाला आणि आरे पोलीस ठाण्याला याविषयी पत्र दिले. मात्र स्टुडिओ क्रमांक १ मध्ये कोणताही कार्यक्रम घेण्यास यापूर्वी परवानगी दिलेली नव्हती, असे कारण पुढे करत १ मेच्या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
वास्तविक, स्टुडिओ क्रमांक १ या ठिकाणी चित्रपट महामंडळाची निवडणूक, चित्रपट कलाकारांच्या विविध २८ संघटनांचे कार्यक्रम, गणपती पूजन यापूर्वीही झाले आहे आणि नेहमी होतात. याविषयी संघटनेचे सरचिटणीस रोहित पांडे यांनी सांगितले की, रयतराज कामगार संघटनेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांनी मिळून पहिल्यांदाच हा कार्यक्रम आखला होता. यात कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप,
शालेय शिक्षणातील प्रगतीविषयी सन्मान आणि गुणवंत कामगारांचा सन्मान असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)