शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रात कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! गेल्या २४ तासांत ८०६७ नवे रुग्ण, ओमायक्रॉनचे एकूण ४५४ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 20:34 IST

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८०६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८०६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात ४ ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. यासह राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता ४५४ इतकी झाली आहे. राज्यात काल ५,३६८ रुग्ण आढळले होते. रुग्णवाढीचा दर पाहता राज्यात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र समूह संसर्गाबाबत अधिकृतरित्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.   

राज्यात आज एकूण ८,०६७ रुग्ण आढळून आले आहेत. तर १७६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय ८ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. राज्यात सध्या २४ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७.४६ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. तर मृत्यू दर २.११ टक्के इतका आहे. 

ओमायक्रॉनमध्ये मुंबईचा आकडा धडकी भरवणाराराज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात मुंबईची आखडेवारी धडकी भरवणारी आहे. राज्यातील एकूण ४५४ ओमायक्रॉन रुग्णांपैकी ३२७ रुग्ण एकट्या मुंबईतच आहेत. याशिवाय मुंबईत दिवसागणिक २ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मुंबईत काल २५१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याच चित्र आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन