Maharashtra Corona Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ सुरू होती. मात्र काल आणि आज कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३ हजार ८२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र दोनच दिवसांत हा आकडा १२ हजारांनी खाली आला आहे.
CoronaVirus News: दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत १२ हजारांची घट; राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:11 IST