शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Rajesh Tope: मोठी बातमी! रुग्णसंख्या वाढतेय, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्बंधांबाबत निर्णय घेणार; राजेश टोपेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 13:06 IST

राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

मुंबई-

राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक काळजी घेण्याची आणि कदाचित निर्बंध अधिक कडक करण्याची गरज पडू शकते. याबाबत येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी कोरोना रुग्णवाढीची आकडेवारीची माहिती देत राज्यात हळूहळू चिंताजनक वातावरण निर्माण होत असल्याची जाणीव करुन दिली. नागरिकांनी आता गाफील राहू नये. गेल्या सात दिवसांत रुग्णवाढीचा दर झपाट्यानं वाढताना दिसतोय, असं राजेश टोपे म्हणाले. 

मुंबईचा रुग्णवाढीचा दर धोकादायकमुंबईत रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेट आता ४ टक्क्यांवर गेला आहे आणि ही आकडेवारी धोकादायक आहे. २० जानेवारी रोजी मुंबईत दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. पण आता आकडा १ हजारावर पोहोचला आहे. आज मुंबईत १३०० रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर हा आकडे अंदाजे २२०० वर पोहोचेल, त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असं राजेश टोपे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्बंधांबाबत निर्णय घेणारराज्यातील कोरोना रुग्णवाढीची माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहे. त्यानंतर सविस्तर चर्चा करुन निर्बंधांमध्ये काही वाढ करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कारण सध्याची रुग्णवाढ पाहता निर्बंधांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी आता सतर्क राहून जास्त गर्दी होईल अशा ठिकाणी जमणं टाळायला हवं. लग्नसमारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी करू नये, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं आहे. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या