शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 20:35 IST

मोदी म्हणाले, "महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत. शिंदेजींनी अत्ताच आपल्या भाषणात याचा उल्लेखही केला.

बंधूंनो, आता काँग्रेस उघडपणे व्होट बँक आणि तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहे. आपण ऐकले असेल, आता इंडी आघाडीचे लोक व्होट जिहादसाठी आवाहन करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत, असे म्हणत आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

"ये रिश्ता क्या कहलाता है?" -मोदी म्हणाले, "महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत. शिंदेजींनी नुकतेच आपल्या भाषणातही याचा उल्लेख केला. कसाबसह जे 10 दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, असे वाटते, काँग्रेस त्यांच्यासोबत काही तरी नातेसंबंध सांभाळात आहे. देश विचारतोय, काँग्रेसचे लोक आणि दशतवाद्यांच्या या नात्याला काय म्हणायचे? (ये रिश्ता क्या कहलाता है?)" 

लक्षात असू द्या मोदी पर्वतासारखा तुमच्या समोर उभा आहे -"देश तो दिवस विसरलेला नाही, जेव्हा काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांचे स्वागत पंतप्रधानांच्या निवासस्थानी होत होते. देशाने तो दिवसही बघितला आहे. जेव्हा दिल्लीत बाटला हाऊसमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या अश्रू ढाळत होत्या. दहशतवाद्यांच्या मरण्यावर. इंडी आघाडीवाल्यांनो तेच दिवस परत आणायचे आहेत का?" असा सवाल करत, "लक्षात असू द्या मोदी पर्वतासारखा तुमच्यासमोर उभा आहे," असा इशाराही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

"...राम मंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू" -एका जुन्या काँग्रेस नेत्याच्या विधानासंदर्भात बोलताना मोदी  म्हणाले, "आपण आश्चर्य वाटून घेऊ नका, पण एका जुन्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, न्यायालयातून जेव्हा राम मंदिराच्या बाजूने निर्णय आला होता, तेव्हा शहजाद्याने (राहुल गांधींना उद्देशून) खास लोकांची मिटिंग बोलावली होती. शहजादा म्हणाला होता, काँग्रेस सरकार आल्यानंतर, राममंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू. यांच्या वडिलांनी तीन तलाक प्रकरणात शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्मय बदलला होता. म्हणत आहेत, त्याच पद्धतीने राम मंदिराचा निर्णयही बदलू." 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी