शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:34 IST

Devendra Fadnavis criticized Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

कुंदन पाटील लोकमत न्यूज नेटवर्क  

जळगाव : स्वातंत्र्याच्या लढ्यात जनजाती समाजातील अनेक नायक लढले. मात्र, दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. या नायकांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचू दिला नाही. जनजाती समाजातील नायकांना अपराधी ठरवण्याचा प्रयत्न झाला आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या योगदानाला उपेक्षाच मिळाली. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील नायकांना शोधून त्यांची स्मारके उभारण्याचा आम्ही निश्चय केला आहे. त्यातून नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धरणगाव येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या नायकांना योग्य सन्मान देण्याचा विडा उचलला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धरणगाव येथील क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांच्या स्मारकासह संग्रहालयाचे उद्घाटन आणि गोद्री (ता. जामनेर) येथील हिंदू गोर बंजारा- लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या ई-भूमिपूजनानंतर ते बोलत होते. धरणगाव महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आदिवासी, जनजातींसह विविध समुदायांच्या लढवय्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

‘बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही!शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून जोरदार टीका केली. ‘मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही,’ अशा मोजक्या शब्दांत उत्तर देत ठाकरेंच्या टीकेला फारसे महत्त्व न दिल्याचे जळगाव दौऱ्यातून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. धरणगाव येथे क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारक व संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी जाण्यासाठी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे