शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

भाजपचा दिग्गजांना धक्का! फडणवीसांकडे गृह तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांना मिळाली अनपेक्षित खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 06:37 IST

Maharashtra Cabinet portfolios : चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या दिग्गज भाजप नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. काहींना अनपेक्षितपणे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. महत्त्वाच्या खात्यांवरून भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये धाकधूक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात दिले होते. जाहीर झालेल्या खातेवाटपात त्याचा प्रत्यय आला.  फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवार यांच्याकडे वित्त व नियोजन तसेच वन अशी खाती होती. आता त्यांच्याकडे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती आली. चंद्रकांत पाटील यांना महसूल, गृह किंवा सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती मिळतील, असे मानले जात असताना त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व सांसदीय कार्य अशी खाती आली आहेत. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही अत्यंत महत्त्वाची खाती होती. राधाकृष्ण विखे-पाटील यांना सर्वात महत्त्वाच्या खात्यांपैकी एक मानले जाणारे महसूल खाते देण्यात आले आहे. या खात्याचे दावेदार म्हणून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्याकडे बघितले जात होते.  दिग्गजांना धक्के बसले. पण, त्यातून गिरीश महाजन बचावले. त्यांना ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते मिळाले. सोबतच वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण ही आणखी दोन खाती मिळाली असली तरी विस्तारात ती त्यांच्याकडून निघतील आणि त्यांच्याकडे केवळ ग्रामविकास खाते ठेवले जाईल, असे समजते.विजयकुमार गावित यांना शेवटी आदिवासी विकास खाते मिळाले. पण, अनुसूचित जातीचे असलेले सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय खाते मिळाले नाही. त्यांना कामगारमंत्री करण्यात आले. खाडे हे फडणवीस सरकारमध्ये शेवटचे चार महिने सामाजिक न्याय मंत्री होते.

खातेवाटप...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफगुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छतादादा भुसे : बंदरे व खनिकर्मसंजय राठोड : अन्न व औषध प्रशासनसंदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादनउदय सामंत : उद्योगप्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणअब्दुल सत्तार : कृषीदीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषाशंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकाससुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायचंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यडॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकासगिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सुरेश खाडे : कामगाररवींद्र  चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षणअतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याणमंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र