शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cabinet Expansion : ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा नाराजीनाट्य होतंच - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 08:41 IST

Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिल्याची पवार यांची माहिती.

राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे.  राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा नाराजीनाट्य हे होतंच असं म्हटलं.

“११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार आहे. कालच देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितलं, निमंत्रणही आलं आहे. मी विरोधीपक्ष नेता या नात्यानं मंत्रिमंडळ विस्तारासाठी हजर राहणार आहे,” असं अजित पवार म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“नाराजी बद्दल मला काहीच माहित नाही. कोणाचंही सरकार असतं, मंत्रिमंडळाचा विस्तार होतो तेव्हा अनेकांना वाटतं आपण काम केलं आहे, का संधी मिळत नाही?. ज्यांना संधी मिळते ते समाधानी आणि खूश असतात. ज्यांना ती मिळत नाही त्यांची नाराजी पाहायला मिळते. हे पूर्ण मंत्रिमंडळ नाही अशी ऐकीव बातमी आहे. त्यामुळे किती लोकांचं मंत्रिमंडळ आहे माहित नाही. जे राहिले आहेत, त्यांना तिसऱ्या टप्प्यात संधी देऊ असं सांगू नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील,” असं ते म्हणाले. शपथविधी घेऊन नंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतील. त्यानंतर अधिवेशनाबाबत, कामकाज सल्लागार समितीबाबतही चर्चा करतील, अधिवेशन व्यवस्थित पार पडण्याकरिता तिसरा टप्पा हा अधिवेशनाच्या नंतर शपथविधी पार पडेल अशा आपला अंदाज असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र