शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा ग्रहण; उद्याचा मुहूर्त टळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:29 IST

बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले. त्याच आधारे ५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला. सरकार स्थापन होऊन ३५ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही. परंतु शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. 

३० जूनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विधानसभेत सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्याने कॅबिनेट विस्तार रखडला आहे. त्याशिवाय शिंदे गट आणि भाजपा यांच्यात खातेवाटपावरून सहमती बनत नसल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोलले जात आहे. सरकार चांगले काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 

बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले. त्याच आधारे ५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रहण लागलं आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार की नाही यावर सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत कॅबिनेट विस्तार टळला आहे. 

१५ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल - मुनगंटीवार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे माहिती नाही. परंतु एक नक्की १५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल. कारण अमृत महोत्सवी वर्षाचं हे झेंडावंदन आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या पूर्वा राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तार उद्याच करायचा असेल तर त्यालाही बंधन नाही. दिल्लीवारी वाढली म्हणजे याद्या निश्चित झाल्या असतील. मुख्यमंत्री राज्यपालांना तारीख कळवतील त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडेल असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.  

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार