शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Maharashtra Cabinet Expansion: १९ जणांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:45 IST

आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे आणि संजय बनसोडे यांना लॉटरी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला असून तब्बल १९ जणांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे आणि संजय बनसोडे यांची तर लॉटरीच लागली आहे. कारण हे चारही जण पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले असून थेट मंत्री बनले आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार करण्यात आला. तब्बल ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अनुभवी आणि नवख्या चेहऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला असला तरी ते पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. यापूर्वी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हेही पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. विदर्भातील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या काँग्रेस नेत्यांचा देखील पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तिसºयांदा आमदार झालेले बच्चू कडू यांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे.बाळासाहेब पाटील, अनिल परब, शंभुराज देसाई, उदय सामंत, संदीपान भुुमरे, शंकरराव गडाख, के. सी. पडवी, अस्लम शेख, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAditi Tatkareअदिती तटकरेPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे