शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:06 IST

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार!

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा 1.50 लाखांहून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra budget 2023) ही घोषणा करण्यात आली. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. 

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहे. यामध्येमहात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य  योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. याशिवाय, नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.40 लाखांहून 4 लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात 700 दवाखाने उघडण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याचबरोबर, निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार असून प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान केले जाणार आहे, असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना?राज्यातील दारिद्ररेषेखालील विशेषकरुन पिवळी शिधापत्रिका धारकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने 2 जूलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी जनारोग्य सुरु केली. पुढे 21 नोव्हेंबर 2013 ला राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे 'महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना' (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका, अत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना तसेच केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdoctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यBudgetअर्थसंकल्प 2023Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023