लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन दादांच्या आठवणीने जड झाल्याचे पाहायला मिळाले. अजितदादांच्या स्मृतींना हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.
अजितदादांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नाते दृढ झालेले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच राज्याची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. ‘काम करणारा माणूस’ ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्मारक उभारणारअजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारण्यात येईल तसेच त्यांच्या नावे ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्यात येईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.अर्थसंकल्पीय भाषणाला सुरवात होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.
Web Summary : Fadnavis dedicated the budget to Ajit Pawar, acknowledging his contribution to state finances. Pawar's work ethic and vision inspire today. A memorial and a 'Dynamic Civic Service Award' in Pawar's name will be established.
Web Summary : फडणवीस ने बजट अजित पवार को समर्पित किया, राज्य के वित्त में उनके योगदान को स्वीकार किया। पवार की कार्यशैली और दूरदृष्टि आज भी प्रेरणादायक है। पवार के नाम पर एक स्मारक और 'गतिशील नागरिक सेवा पुरस्कार' स्थापित किया जाएगा।