Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दोन दिवसांपूर्वी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजितदादांकडे महाराष्ट्राचे अर्थ खाते होते, त्यामुळे त्यांच्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा आगामी अर्थसंकल्प मांडण्याची दाट शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. अजितदादांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी औपचारिकरीत्या कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी होती आणि त्यांनीच त्या काळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे यंदाही ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस पार पाडतील, असा अंदाज आहे.
अर्थ खात्याबाबत राजकीय चर्चा सुरू
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे, अर्थ खाते कोणाकडे सोपवले जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थ खाते हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे खाते असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे दिले जाणार की, मुख्यमंत्री फडणवीस हे खाते स्वतःकडेच ठेवणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत आहे. असे झाले, तर त्यांच्याकडेही अर्थ खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळेच येत्या काळातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असेल.
Web Summary : Following Ajit Pawar's sudden demise, Devendra Fadnavis is likely to present Maharashtra's budget. The budget session starts February 23, 2026. Discussions are ongoing about who will manage the crucial finance portfolio, with potential candidates from NCP or Fadnavis himself. Political circles buzz with speculation.
Web Summary : अजित पवार के आकस्मिक निधन के बाद, देवेंद्र फडणवीस के महाराष्ट्र का बजट पेश करने की संभावना है। बजट सत्र 23 फरवरी, 2026 से शुरू होगा। इस बारे में चर्चा चल रही है कि महत्वपूर्ण वित्त विभाग का प्रबंधन कौन करेगा, संभावित उम्मीदवार एनसीपी या स्वयं फडणवीस हैं। राजनीतिक गलियारों में अटकलें तेज हैं।