शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:08 IST

राज्यातील जलसिंचनाबाबत अजित पवारांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय, राज्यातील जलसिंचन आणि नदीजोड प्रकल्पाबाबतही अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमराज्यातील अपू्र्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्राणातीलील सुधारेणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतिची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत.

जलयुक्त शिवार अभियान 2.0जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किमतींची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत. अभियानातील सर्व कामे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवारही योजना राज्यात कायमस्वरुपी राबवण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नदीजोड प्रकल्पवैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88 हजार 574 कोटी रुपये असून, प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अलोका व बुलाढाणा या सहा जिल्ह्यांना होणार आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे सुरू आहेत.

नार-पार-गिरणा नदीजोडया प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रुपये आहे.

दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोडया नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 978 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रुपये आहे.

तापी महापुनर्भरणशासनाने महत्वकांशी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळणारकोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खेऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातून मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाला पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे