शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2022: वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:48 IST

Maharashtra Budget 2022:राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी

मुंबई: आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करत आहे. यावेळी सरकारने विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात शिक्षण विभागासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवणारदेशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटीयाशिवाय, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठांना पन्नास वर्षे झाल्यामुळे दोन्ही विद्यापीठांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, तिकडे हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणाही पवारांनी केली.

शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींची तरतूदशालेय शिक्षण विभागासाठी 2 हजार 354 कोटी रुपयांची तरूतूद करण्यात आली आहे. शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी. शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार आहेत. याशिवाय, संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार. शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबईच्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी