शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Maharashtra Budget 2022: फडणवीस म्हणाले, निराशाजनक अर्थसंकल्प; भाजपच्या आमदार मात्र तोंडभरून कौतुक करून गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:46 IST

Maharashtra Budget 2022: या बजेटचं मी स्वागत करते, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आभार; भाजप आमदारांकडून सरकारचं कौतुक

मुंबई: ठाकरे सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलं आहे, अशा तिखट शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर तोफ डागली. सरकारनं राज्यातील गोर गरीब, दीन-दलित, शेतकरी, कामगार, मराठा, ओबीसी, आदिवासी अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामं केल्याची टीका त्यांनी केली. मात्र फडणवीस यांच्याच पक्षाच्या आमदार असलेल्या मंदा म्हात्रेंनी अर्थसंकल्पाचं स्वागत करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेबद्दल भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकारचे आभार मानले.

'नवी मुंबईकरांकडून मी ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचं स्वागत करते. महाराष्ट्र भवनाचा विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित होता. वेळोवेळी मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला. आज अर्थमंत्र्यांनी त्यासाठी १०० कोटींची तरतूद जाहीर केली. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानते,' असं म्हात्रे म्हणाल्या.

फडणवीसांची कडक शब्दांत टीकाराज्य सरकारचं बजेट कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटला कोणत्याही प्रकारची दिशा नाही. मागील बजेटमधील आणि चालू असलेल्या कामाच्याच घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या आहेत. आमच्याच योजनांचं श्रेय  घेण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत आहे. समृद्ध महामार्गासह बुलेट ट्रेनला विरोध करणारं सरकार आता त्याचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करत आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारने केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यातही हे सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Manda Mhatreमंदा म्हात्रेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस