शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2018 : महाराष्ट्राचा प्रगतशील अर्थंसकल्प – विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 19:54 IST

मुंबई  - महाराष्ट्राला विकासाकडे आणि अर्थिक प्रगतीकडे नेणारा हा अर्थंसकल्प आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, साहित्यिक, उद्योजक, भटक्या व विमुक्त जाती, महिला आदी समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले आहे. दिव्यांगाचाही विशेष विचार करण्यात आला असून, त्यांच्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन ...

मुंबई  - महाराष्ट्राला विकासाकडे आणि अर्थिक प्रगतीकडे नेणारा हा अर्थंसकल्प आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, साहित्यिक, उद्योजक, भटक्या व विमुक्त जाती, महिला आदी समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले आहे. दिव्यांगाचाही विशेष विचार करण्यात आला असून, त्यांच्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे.

शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या माध्‍यमातून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत वाढविल्याचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आल्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि मराठी नाट्य संमेलनाकरीता अनुदानात दुप्पटीने वाढ करुन महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राचा यथोचित सन्मान राखण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संरक्षित किल्यांच्या थ्रीडी मॅपींगसाठी केलेल्या तरतूदीमुळे गडकिल्यांच्या संवर्धनाला अधिक मदत होणार आहे. ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग.दि.माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्षाकरीता त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगावकर, नाट्य कलाकार मच्छिंद्र कांबळी, कविवर्य ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकाकरिता तरतूद करुन त्यांच्या कार्याचा सन्मान राखण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Vinod Tawdeविनोद तावडे