शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2018: राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 13 हजार कोटींची कर्जमाफी- अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:30 IST

2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचा दावा केला. यासाठी तब्बल 13 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सरकारकडून गुरुवारी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याशिवाय, गेल्या काही काळापासून कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूदी असणार याबद्दल अटकळ बांधली जात होती. त्यानुसार आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसोबत सिंचन आणि जलसंपदा विभागासाठी अनेक तरतूदी दिसून आल्या. 

आतापर्यंत राज्यातील 35.68 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असून त्यासाठी 13 हजार 782 कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. तर आगामी वर्षात जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या महत्त्वपूर्ण तरतुदी पुढीलप्रमाणे:

* शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.* सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद* सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी आणि विहिरींसाठी १३२ कोटींची तरतूद* वनशेतीस प्राधान्य देण्यासाठी 15 कोटींची तरतूद* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार * कोकणातील आंबा, काजू उत्पादन वाढवण्यासाठी १०० कोटी रुपये तरतूद* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार * मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.* पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांकरिता ३ हजार ११५ कोटी २१ लक्ष निधीची तरतूद* जलसंपदा विभागासाठी ८ हजार २३३ कोटी १२ लक्ष रूपयाची तरतूद* कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद.* जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधी* मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण. त्यासाठी १६० कोटी एवढा निधी. 

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार