शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : मराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:43 IST

आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.

ठळक मुद्देमराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपतीजाहीर यल्गार सभेत निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर : आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.

कोल्हापूरात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर यल्गार सभेत ते बोलत होते.दसरा चौकात सकाळी नऊ वाजल्यापासूनच युवक गावागावातून हातात भगवे झेंडे घेतलेले युवक मोटारसायकल वरुन यायला सुरुवात झाली.सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर चार वीरमातांच्या हस्ते आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत व मराठा आरक्षण गीताने जाहीर सभेचा प्रारंभ झाला.

अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. प्रमुख उपस्थिती महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुडकर, माजी आमदार मालोजीराजे, समन्वयक दिलीप देसाई, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील आदींची होती.

शाहू छत्रपती म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवावा लागेल. कारण केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे.

 

डॉ. थोरात म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लोकांचा आवाज सरकारने ऐकावा. या सरकारने काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही. परंतु आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लावलेला नाही. मराठा समाजातील दुर्बल घटकाला शिक्षण व रोजगाराची हमी मिळेल तेव्हाचे खऱ्या अर्थाने युध्द जिंकले जाईल.जयसिंगराव पवार म्हणाले, आरक्षणाचे आंदोलन हे असेच धगधगत ठेवले पाहीजे. त्या शिवाय सरकार नमणार नाही. आंदोलकांनी या सरकारला चांगलेच वठणीवर आणले आहे. मराठा तरुणांनी आततायीपणा करुन आत्महत्या करु नये. कारण ही लढाई तुमच्यासाठीच सुरु आहे.प्रतापसिंह जाधव म्हणाले, तामिळनाडूत जयललितांनी खंबीरपणे पेरियार समाजला आरक्षण मिळवून दिले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारखी हातात काकणं भरली नव्हती. यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, प्रा. जयंत पाटील, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे यांचे भाषण झाले. पंडीत कंदले यांनी सुत्रसंचालन केले.

निर्वाणीचा इशाराचार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, असा निर्वाणीचा इशारा या जाहीर यल्गार सभेत मराठा नेत्यांनी दिला. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती