ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात ६५ वसतीगृह सुरू, काही जिल्ह्यात भाड्याने जागा घेणार, मुख्यमंत्र्यांनी केले ओबीसी कल्याण मंत्र्यांचे कौतुक
By आनंद डेकाटे | Updated: December 9, 2025 14:59 IST2025-12-09T14:57:39+5:302025-12-09T14:59:40+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यासाठी राज्यात ६५ ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यात आली आहे. उर्वरीत जिल्ह्यात महसूल विभागाच्या मदतीने जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. तर, काही ठिकाणी पीडब्लूडीने दर वाढवून दिल्याने भाडेतत्वावर जागा घेऊन वसतीगृह सुरू करण्यात येईल, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात ६५ वसतीगृह सुरू, काही जिल्ह्यात भाड्याने जागा घेणार, मुख्यमंत्र्यांनी केले ओबीसी कल्याण मंत्र्यांचे कौतुक
- आनंद डेकाटे
नागपूर - राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यासाठी राज्यात ६५ ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यात आली आहे. उर्वरीत जिल्ह्यात महसूल विभागाच्या मदतीने जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. तर, काही ठिकाणी पीडब्लूडीने दर वाढवून दिल्याने भाडेतत्वावर जागा घेऊन वसतीगृह सुरू करण्यात येईल, अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करीत मंत्री व विभागाचे कौतुक करीत, जागेसाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला.
भाजपच्या मनीषा चौधरी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. मंत्री सावे म्हणाले, ३६ जिल्ह्यात ७२ वसतिगृह सुरू व्हायला हवे होते. सध्या ६५ वसतिगृह भाड्याच्या जागेवर सुरू आहेत. सात जिल्ह्यात स्वत:च्या जागा मिळाल्या आहे. काही ठिकाणी डेअरीच्या जागा महसूल विभागाच्या माध्यमातून् मिळविल्या जात आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर येथे दर कमी असल्याने जाग मिळत नाही. आता दर वाढवून मिळाल्याने हा प्रश्नही सुटेल. वसाई, उल्हासनगर येथेही वसतीगृह सुरू होईल. तर, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परीक्षांसाठीच्या मदतीसाठीही साधार व स्व्यंमच्या माध्यमातून् मदत केली जात आहे. अजय चौधरी, अमित देशमुख,योगेश सागर, आदित्य ठाकरे,नाना पटोले यांच्यासह इतरही विविध प्रश्न उपस्थित केले.