शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 14:20 IST

Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०)  मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.

देशभरात दोन राज्यांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांचे आज मतदान होत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत झारखंड महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. 

दुपारी १ वाजेपर्यंत झारखंडमध्ये ४७.९२ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले असून ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

यानंतर गोंदिया जिल्ह्यात ४० टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात ३८.५६ टक्के असे मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात २९.०३ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि बारामतीत अनुक्रमे ३५.६३ आणि ३३.७८ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पर्वती मतदारसंघात २७.१९, पिंपरीत २१.३४, शिवाजीनगर २३.४६, वडगाव शेरी २६.६८ टक्के मतदान झाले आहे. पुणेकरांसमोर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०)  मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग