शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

By यदू जोशी | Updated: October 26, 2024 05:52 IST

आपसातील वादामुळे विलंब

यदू जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेच्या राज्यातील ३६ जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. २५२ जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या ३६ पैकी १३ जागा या विदर्भातील आहेत. त्यात आकोट, अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, मोर्शी, आर्वी, सावनेर, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, आर्णी आणि उमरखेडचा समावेश आहे. नांदेड दक्षिण, देगलूर, मालेगाव मध्य, डहाणू, वसई, भिवंडी पूर्व, कल्याण प., उल्हासनगर, बोरीवली, वर्सोवा, मानखुर्द शिवाजीनगर, शिवडी, पेण, खडकवासला, पुणे कँटोन्मेंट, श्रीरामपूर, बीड, माढा, सोलापूर मध्य, पंढरपूर, माळशिरस, फलटण, कोल्हापूर उत्तरमध्ये दोघांनीही उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

दोन्ही बाजूंनी उमेदवार जाहीर न होण्यामागे काही कारणे सांगितली जातात. आर्वीत ­आमदार दादाराव केचे की, सुमित वानखेडे हा निर्णय झालेला नाही. मविआकडून वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा यांना उमेदवारी मिळू शकते. सावनेरमध्ये आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या काँग्रेसच्या उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. भाजपचा उमेदवार ठरायचा आहे.

३६ पैकी १५ मतदारसंघांत भाजपचे आमदार

महायुती वा महाविकास आघाडी या दोन्हींपैकी कोणीही उमेदवार जाहीर केलेले नाहीत, अशा ३६ जागांपैकी १५ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत.  ते असे - प्रकाश भारसाकळे - आकोट, दादाराव केचे - आर्वी, डॉ. देवराव होळी - गडचिरोली, डॉ. संदीप धुर्वे - आर्णी, नामदेव ससाणे -उमरखेड, कुमार आयलानी - उल्हासनगर, सुनील राणे - बोरीवली, भारती लव्हेकर - वर्सोवा, रविशेठ पाटील - पेण, राम सातपुते - माळशिरस, समाधान औताडे - पंढरपूर.  (कारंजाची जागा भाजपचे राजेंद्र पाटणी यांनी, तर अकोला प. जागा गोवर्धन शर्मा यांनी जिंकली होती, त्यांचे निधन झाले.)

हे उमेदवार प्रतीक्षेत

  • सोलापूरला लोकसभा हरलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना माळशिरसमधून भाजपने अद्याप उमेदवारी दिलेली नाही. 
  • पुणे कँटोन्मेंटमध्ये भाजपचे सुनील कांबळे अद्यापी प्रतीक्षेत आहेत. 
  • खडकवासलामध्ये भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांची तीच स्थिती आहे. 

समोरचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा

  • मेळघाटचे विद्यमान आमदार बच्चू कडूंचा प्रहार पक्ष सोडून शिंदेसेनेत गेले, पण त्यांना शिंदेसेनेची उमेदवारी मिळाली नाही. ही जागा भाजपकडे जाणार असे म्हटले जाते. 
  • या ३६ मध्ये काही मतदारसंघ असे आहेत की, महायुती वा मविआत कोणता मित्रपक्ष लढणार हे नक्की नाही किंवा जागावाटप झालेले असले, तरी समोरचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा केली जात आहे. 

किती जागा आहेत अजून बाकी?

  1. महायुतीचे अद्याप ९९ उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. महाविकास आघाडीच्या १३० जागा अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. उमेदवार जाहीर करण्याबाबत सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली आहे. 
  2. दोन्हींनी उमेदवार दिलेले नाहीत, अशा ३६ मतदारसंघांपैकी ७ मतदारसंघ असे आहेत की, जिथे २०१९ मध्ये दोन्हींना विजय मिळाला नव्हता. तेथे अपक्ष वा लहान पक्षांचे उमेदवार जिंकले होते. त्यात प्रहार, एमआयएम, बहुजन विकास आघाडी, अपक्ष आमदारांचा समावेश आहे. 
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४