शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्षप्रवेश नावालाच..खरी कसोटी गावालाच; अंतर्गत राजकारणाची खेळी

By दत्ता यादव | Updated: November 12, 2024 16:30 IST

दत्ता यादव सातारा : निवडणुकीपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर काही गावांनी पक्ष प्रवेश केले आहेत. मात्र, हे पक्षप्रवेश नावालाच असल्याचे उमेदवार ...

दत्ता यादवसातारा : निवडणुकीपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर काही गावांनी पक्ष प्रवेश केले आहेत. मात्र, हे पक्षप्रवेश नावालाच असल्याचे उमेदवार व कार्यकर्त्यांना ऐनवेळी समजत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन हादरत आहे. ‘ आम्ही आहोत तुमच्यासोबत,’ असे वरकरणी सांगून मत मात्र पहिल्याच पक्षाला देण्याच्या अंतर्गत हालचाली अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे विधानसभेची खरी कसोटी ग्रामीण भागातील गावागावांत पाहायला मिळणार आहे.ग्रामीण भागातील गावागावांत राजकारणामुळे दुफळी निर्माण झाली आहे. गावात दोन-दोन पार्ट्या असल्यामुळे साहजिकच याचा परिणाम गावच्या विकासावर होऊ लागला. त्यामुळे काही गावांनी अंतर्गत राजकारणाची खेळी करून विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पक्षात प्रवेश केला. गावासाठी मिळेल ते काम पदरात पाडून घेऊ. मत कोणाला द्यायचं, हे अंतिम वेळी ठरवू, असं अंतर्गत ठरवून पक्ष प्रवेश केलेल्या पक्षाला व त्यांच्या उमेदवाराला गावकऱ्यांनी झुलवत ठेवलं. याची प्रचिती विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना येऊ लागली आहे.जरी तुम्ही पक्षप्रवेश केला असला तरी आपल्या मूळ पक्षाला विसरू नका, असा अंतर्गत सल्ला राजकीय कार्यकर्त्यांकडून आपल्या हक्काच्या मतदारांना दिला जात आहे. यासाठी वाट्टेल ते करायला राजकीय नेते तयार आहेत. उघड-उघड तुम्ही आमच्यासोबत नाही आला तरी चालेल; पण मत देताना आपल्या पक्षाची जाणीव ठेवा, अशी भावनिक साद घातली जात असून, हक्काच्या मतदारांपर्यंत आतल्या हाताने वेगळीच रसद पुरवली जात आहे.तर दुसरीकडे पक्ष प्रवेश केलेले मतदार हे आपलेच आहेत. याचा भरोसा नेत्यांनाही राहिला नाही. ऐनवेळी दगाफटका होऊ शकतो, याची जाणीवही नेत्यांना होऊ लागली आहे. तुम्ही कितीही पक्ष बदलायचे आणि गद्दारी करायची; पण आम्ही एका पक्षाची गद्दारी गावच्या विकासाठी केली तर काय बिघडलं, असं खासगीत कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

पण ‘तू’ मूळचा आपल्याच पक्षाचा..एका राजकीय कार्यकर्त्याला एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला. तो पदाधिकारी म्हणतो. ‘ मित्रा तू त्या पक्षात प्रवेश केला आहेस, तुझी कामेही त्यांच्याकडून होतायत, हे मला माहिती आहे; पण तू मूळचा आपल्या पक्षाचा आहेस. आता खरी गरज इथे तुझी आहे. तू जर सांगितलंस तर मतदान आम्हाला चांगलं होईल. तुझ्या अडचणीसाठी तू पक्षप्रवेश केलास, काही हरकत नाही; पण मत हे आपल्यालाच देशील, याची मला खात्री आहे. असं भावनिक आवाहनही त्या पदाधिकाऱ्यांना केलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024