शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:30 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मला सोडून गेलेले परत निवडून आले नाहीत, असा एक जुना किस्सा सांगत, आता सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना केला.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साधेसुधे नाही, तर जोरात पाडायचे. संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे, असा एल्गार शरद पवार यांनी एका प्रचारसभेत बोलताना केला.

१९८० मध्ये माझे असेच ५८ आमदार निवडून आले होते. मी तेव्हा परदेशात गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर ५८ पैकी ५२ आमदार मला सोडून गेले होते. मग तीन वर्ष पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि सर्व नवीन नवीन दमाचे उमेदवार उभे केले. मला सोडून गेलेल्या ५२ पैकी एकही आमदार परत निवडून आला नाही, असा किस्सा सांगता मग आता हे जे सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे? गेलेले सगळे पाडायचे, असे निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला.

आपल्याला जे जे सोडून गेले आहेत यांचे आता काय करायचे?

आम्हाला ४० वर्ष साथ दिली म्हणतात, पण ते आता सोडून गेले आहेत. त्याचे काय करायचे? असा प्रश्न शरद पवारांनी सभेत केला. यावेळी त्यांना पाडायचे असे उत्तर गर्दीतून आले. सोडून गेलेल्यांना असे तसे, साधेसुधे पाडायचे नाही तर जोरदार पाडायचे, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. लोळत पाडा. कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवण्यासाठी तुमची मदत हवी  आहे. महाराष्ट्राचे सरकार महिलांविरोधी आहे, तरुणांविरोधी आहे, शेतकऱ्यांविरोधी आहे. सर्वांच्या हिताची जपणूक करण्याची दृष्टी या सरकारची नाही. हे सगळे बदलायचे असेल तर सरकार बदलले पाहिजे. ते काम करायचे असेल तर उद्याच्या २० तारखेला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल. लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे की, महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस