शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:50 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाशी फिसकटताच संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यामुळे या विधानसभेला राज्यात आणखी काही समीकरणे पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली. परंतु दिलेला शब्द पाळला नाही, आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत संभाजी ब्रिगेड या युतीतून बाहेर पडली आहे. यातच आता संभाजी ब्रिगेडचे नेते अंतरवाली सराटीत पोहोचले असून, मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

२०२२ मध्ये संभाजी ब्रिगेडने ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली होती. लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रचंड ताकदीने सहकार्य केले. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रचारक, वक्ते फिरले. लोकसभेत महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला, चांगल्या जागा मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत आम्हाला ५-६ जागा देऊ, असे उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले होते. मात्र गेल्या महिनाभर बैठका घेतल्या, आम्हाला ताटकळत ठेवले परंतु कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी केला. 

मनोज जरांगे पाटील यांच्याशी चांगला समन्वय, चर्चा करून उमेदवार ठरवू

संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीबाबत मनोज आखरे यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजी ब्रिगेड एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा. तसेच ओबीसींची संरक्षण व्हावे. हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. तीच भूमिका जरांगे पाटील यांनीही घेतली आहे. समविचारी लोकांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका प्रश्न मार्गी लावायचे असेल तर विधानसभेत आपली माणसे पाहिजेत. आपला झेंडा आपला अजेंडा ही भूमिका पाहिजे. याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल चालू होईल. मनोज जरांगे पाटील आणि आमच्या समन्वय चांगला आहे. या लोकशाहीच्या महोत्सवात आम्ही स्वतंत्र सामील होणार आहोत. विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडणारे लोक गेले पाहिजेत. योग्य उमेदवार देण्याबाबत आम्ही पुढे चर्चा सविस्तर करू. जरांगे पाटील यांच्याकडेही आणि आमच्याकडे ही उमेदवार येतात. परंतु आम्ही ठरवून उमेदवार देऊ, असे आखरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणार आहे. मराठा समाजाच्या चळवळीत  प्रत्येकाचे योगदान आहे. आपला समाज पाठीशी उभा राहिला आहे. हे गोर गरीब जर सत्तेत गेले तर गरिबांचे प्रश्न मिटणार आहेत. श्रीमंतांचे प्रश्न मिटले काय आणि न मिटले काय त्यांना काही फरक पडत नाही. किती मतदारसंघात लढायचे, यावर चर्चा होणार आहे. परंतु, आता आम्ही जाहीर करणार नाही. २९-३० तारखेला मतदारसंघ आणि उमेदवार सांगू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील