शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:40 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमके काय आहे, याचा अंदाज घेण्यास एक्झिट पोल सपशेल अपयशी ठरले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार, महायुतीने २२० जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अपक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलपैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता, जनतेचा कौल नेमका कुणाच्या दिशेने आहे, हे समजण्यात सपशेल अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे. 

Watch Live Blog >>

‘एक्झिट पोल’ खूपच गोंधळलेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. निवडणुकीचे हाती आलेले कल पाहता, केवळ पीपल्स पल्स आणि अ‍ॅक्सिस माय इंडिया या दोघांचे एक्झिट पोलचे आकडे त्या जवळ जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु, बाकी सगळे एक्झिट पोल महाराष्ट्राची नाडी ओळखण्यात अपयशी ठरेल. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला असून, २०१४ च्या मोदी लाटेपेक्षाही महायुतीला जास्त जागा मिळताना दिसत आहे. महायुतीची ही त्सुनामी आली असून, महाविकास आघाडीला चांगलाच तडाखा बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. 

एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल!

चाणक्य एक्झिट पोलने महायुतीला १५२-१६०, तर महाविकास आघाडीला १३०-१३८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर पोल डायरीने महायुतीला १२२-१८६ आणि महाविकास आघाडीला ६९- १२१ जागा मिळतील, असे म्हटले होते. दुसरीकडे, इलेक्टोरल एज एक्झिट पोलने महायुतीला ११८, तर महाविकास आघाडीला १५० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली होती. मॅट्रिक्स एक्झिट पोलने महायुतीला १५०-१७० जागा मिळतील. महाविकास आघाडीला ११०-१३० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच पी मार्क्यू एक्झिट पोलने महायुतीला १३७-१५७ जागा आणि महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली होती. रिपब्लिक एक्झिट पोलने महायुतीला १३७-१५७, तर महाविकास आघाडीला १२६-१४६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. 

कोणते एक्झिट पोल हाती आलेल्या कलांच्या जवळ पोहोचले?

पीपल्स पल्स एक्झिट पोलने महायुती १७५-१९५ जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८५ ते ११२ जागा मिळू शकतील. अपक्षांना ०७ ते १२ जागा मिळू शकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या सर्व एक्झिट पोलच्या आकड्यांचा आढावा घेतल्यास जनतेच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज कुणालाच घेता आला नाही, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, लोकसभा निकालातून महायुतीने घेतलेला धडा, लाडकी बहीण योजना, 'एक है तो सेफ है'चा नारा, ओबीसी मतांचे ध्रुवीकरण, जरांगे फॅक्टर निष्प्रभ, मराठा समाज भाजपाकडे परतला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण ताकदीने दिलेला पाठिंबा, काँग्रेस नेत्यांचा गाफिलपणा, जागावाटपात उद्धव ठाकरेंचा हट्ट, शरद पवारांबद्दलची सहानुभूती विशिष्ट भागापुरतीच मर्यादित, वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दिलेले बळ, अशी काही महत्त्वाची कारणे महायुतीने जोरदार मुसंडी मारण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती