शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 22:22 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls:शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर यांना किती टक्के जनतेने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर आता अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला जनतेने पसंती दिली आहे, याबाबतचा एक सर्व्हे समोर आणला आहे. 

१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यामध्ये भाजपाला ९८ ते १०७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ५३ ते ५८ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना २ ते ५ जागा मिळतील, असा अंदाज यात देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरेल. काँग्रेसला २८ ते ३६ जागा, शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३२ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २६ ते ३० जागा आणि मविआतील अन्य पक्षांना २ ते ४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?

CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक मते मिळाली आहेत. एकनाथ शिंदे यांना ३१ टक्के जनतेने पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून किंवा तेच मुख्यमंत्री असावेत, यासाठी कौल दिला आहे. तर, १८ टक्के जनतेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असावेत, असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून १२ टक्के जनतेने पसंती दिलेली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील कोणताही नेता मुख्यमंत्री म्हणून चालेल, असे मत असणाऱ्यांची संख्या १० टक्के आहे. तर, भाजपामधून अन्य कुणीही मुख्यमंत्री झालेला चालू शकेल, असे ५ टक्के जनतेला वाटते. तसेच मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना ५ टक्के, नितीन गडकरी यांना २ टक्के, अजित पवार यांना २ टक्के, नाना पटोले यांना २ टक्के, पृथ्वीराज चव्हाण यांना एक टक्का, जयंत पाटील यांना एक टक्का मते देण्यात आलेली आहे. 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २ टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तसेच अन्य किंवा सांगता येत नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या ६ टक्के असल्याचे अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीChief Ministerमुख्यमंत्री