शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी?’’, विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:14 IST

Maharashtra Assembly Session 2024: अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar ) यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली आहे.

मुंबई - राज्यात अँम्बुलन्स घोटाळा झाला आहे. या  खरेदीत टेंडर फुगवले गेले असून तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. ३०टक्क्यांच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा, अशा शब्दात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, अँम्बुलन्स घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे.  हे सरकार  रूग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. सनदी अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांची बदली देखील झाली. निवडणूक फंडासाठी हा उद्योग सुरू आहे. आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघत असताना हा घोटाळा केला जात आहे. महाराष्ट्र लूटून साफ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी