शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
3
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
4
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
5
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
6
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
7
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
8
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
10
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
11
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
12
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
13
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन
14
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
15
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
16
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
17
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
18
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
19
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
20
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले

विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:56 IST

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांसह इतर विविध कारणांमुळे वादळी ठरत आहे. त्यात आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला. यावेळी गोपिचंड पडळकर यांनी जितेंद्र आव्हा यांना शिविगाळ केली. तर आव्हाड यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात काही काळ वातावरण तंग झाले.

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते. त्यात काही दिवसांपूर्वी गोपिचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबाबत केलेल्या टिप्पणीवरून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. तसेच विधान भवनात जात असणाऱ्या पडळकर यांना त्यांचं नाव न घेता घोषणाबाजी करत डिवचण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

दरम्यान, आज गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे आमने सामने आले.  विधान भवनाच्या गोपिचंद पडळकर यांनी कारमधून उतरत असताना कारचा दरवाजा जोरात ढकलल्याने तो आपल्याला लागल्याचा दावा आव्हाड यांनी केला. त्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिविगाळ करत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, त्यातील एका व्हिडीओत आमदार गोपिचंद पडळकर हे ‘’*** दम असेल तर समोर ये, मी एकटाच आहे, तुझ्यासारखी ** घेऊन फिरत नाही, असे बोलत असल्याचे ऐकू येत आहे. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड