शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:46 IST

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी 'सी-व्हिजिल एप' विकसित केलं आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी 'सी-व्हिजिल एप' विकसित केलं आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या एपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवलं जाणार आहे. 

प्रशासन आता दिवसेंदिवस डिजिटल होत चाललं आहे. त्यामुळे निवडणूक काळात आचारसंहितेचं कोणाकडून उल्लंघन होत असेल तर बसल्या जागी तक्रारी करता येणार आहेत. एरव्ही आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याविषयी निवडणूक आयोगाकडून उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. तरीदेखील आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्यामुळे असे झाले तर त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल एप विकसित केले आहे. 

अशी करा तक्रार... 

उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त एप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडीओ अपलोड करणे आवश्यक आहे. 

भरारी पथक करेल कारवाई 

- नागरिक या एप्लिकेशनचा वापर करून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांत पैसेवाटप किवा अन्य चुकीच्या कामांची, घटनांची तक्रार नोंदवू शकतात. - हे सी-व्हिजिल एप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४technologyतंत्रज्ञानElectionनिवडणूक 2024