शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:01 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची राज्यपालांनी नेमणूक केली आहे. 

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बंपर यश मिळालं असून आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यात भाजपा आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते यांच्यात मुख्यमंत्रि‍पदावरून स्पर्धा सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यातच मोदी-शाह जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. एकनाथ शिंदे यांनीही स्पष्टपणे वरिष्ठांना कळवलं आहे अशी माहिती शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली. 

एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक करण्यात आली आहे. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणे ही कायदेशीर तरतूद असते. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदेंची नेमणूक केली आहे. वरिष्ठांनी बोलावल्यानंतर तिन्ही नेते दिल्लीत जातील किंवा पक्षाचे वरिष्ठ इथं येणार असतील तर इथं बैठक होईल. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. तिन्ही नेत्यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे निर्णय सोपवला आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी नवं सरकार काम करेल त्यावर तिघांचे एकमत आहे. एकनाथ शिंदे यांची बिल्कुल नाराजी नाही. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असेल हे वरिष्ठांना एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे कळवलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

तसेच एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. येत्या काही दिवसांत नवीन सरकार स्थापन होईल. भाजपाची कदाचित उद्या गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. यानंतर तिन्ही नेते एकत्रित बसतील. चर्चा करतील. पक्षश्रेष्ठींकडे जाऊन ते जे काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापन होईल. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. परंतु जो निर्णय मोदी आणि शाह घेतील तो सर्वांना मान्य असेल असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मागणी आग्रहीपणे करण्यात येत होती. अखेरीस बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटीनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड करण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचं वृत्त दिलं असलं तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात सलग पाच वर्षे राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले होते. आता पुन्हा राज्यात फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगितले जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDeepak Kesarkarदीपक केसरकर