शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 02:49 IST

वर्ष 2019 चा विचार करता, तेव्हा एकूण 24 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आता हा आकडा 22 वर आला आहे.

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार मैदानात होते. यात 363 महिलांचा समावेश होता. अर्थात एकूण उमेदवारांच्या तुलनेत 10 टक्क्यांपैक्षाही कमी महिला मैदान होत्या. मात्र, 2019 चा विचार करता हा आकडा अधिक आहे. 

वर्ष 2019 चा विचार करता, तेव्हा एकूण 24 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आता हा आकडा 22 वर आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील दोन प्रमुख आघाड्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या 55 महिला उमेदवारांपैकी महायुतीच्या 21 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत, तर महाविकास आघाडीकडून केवळ एकाच महिला उमेदवाराचा विजय झाला आहे.

मुंबईमध्ये होत्या सर्वाधिक उमेदवार -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, मुंबईमधून 39 एवढ्या सर्वाधिक महिला उमेदवार होत्या. याशिवाय, ठाण्यात 33, पुण्यात 21, नाशिकमध्ये 20 आणि नागपूरमध्ये16 महिला उभ्या होत्या. 

पुण्याच्या पार्वतीमध्ये भाजपाच्या माधुरी मिसाळ आणि एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाच्याच अश्विनी कदम यांच्यात लढत होती. येथे मिसाळ यांनी 1,18,193 मतांसह विजय मिळवला. त्यांच्या विजयातील अंतर 54,660 मतांचे होते. माधुरी मिसाळ यांनी आतापर्यंत चार विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. 

नवाब मलिक यांच्या मुलीचा विजय -मुंबईतील अणुशक्ती नगरमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सना मलिक यांचाही विजय झाला आहे. वडील नवाब मलिक यांच्या जागेवर विजय मिळवत त्या आता राजकारणात उतरल्या आहेत. इतर विजेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांचा समावेश आहे, त्या श्रीवर्धनमधून 1,16,050 मतांनी विजयी झाल्या आहेत. देवळालीत सरोज अहिरे, वसईत भाजपच्या स्नेहा दुबे पंडित, नाशिक मध्यमध्ये देवयानी हरांडे आणि साक्रीत शिवसेनेच्या मंजुळा गावित, यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत मविआचा केवल एकच उमेदवार जिंकला आहे -या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या मविआच्या केवल एका महिला उमेदवाराचा विजय झाला आहे. धारावी मतदारसंघात काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विजयी झाल्या आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी