शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 19:45 IST

maharashtra assembly election : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण असावा? यासंदर्भात सर्वसामान्यांमध्येही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते...

महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीत महायुतीला अतिप्रचंड बहुमत मिळाले आहे. यानंतर आता मुख्यमत्री पदाचीही चर्चा होऊ लागली आहे. महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांंतील नेते आपापली इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. याशिवाय, राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण असावा? यासंदर्भात सर्वसामान्यांमध्येही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

संजय राऊतसारखं बोलायला लागलो, तर... -यावेळी, शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षाचा दावा असणार आहे का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, "बघा, मी फार छोटा मानुष्य आहे. संजय राऊतसारखं बोलायला लागलो, तर लोक मलासुद्धा तसेच मानून चालले असते. मी एक जबाबदार प्रवक्ता आहे आणि त्यामुळे जबाबदारीने बोलेन एवढे मी सांगतो," असे दीपक केसरकर म्हणाले. 

केसरकर पुढे म्हणाले, "ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली आणि फार चांगला निकाल आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने तर आम्ही नेहमीच विचार करतो की, त्यांना पहिले प्राधान्य द्यायला हवे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम आणि विश्वास आमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहे. 

या जोडीला देवाचाही आशीर्वाद -ही दोघांची जोडी आहे. हे बघा, या जोडीने काय चमत्कार करून दाखवला. अजित दादा नंतर सहभागी झाले. त्यामुळे अजित दादांनाही याचे क्रेडिट आहे. पण हे दोघे पहिल्यापासूनच सोबत चालत आहेत. ही जोडी कायम राहील आणि त्यांना देवाचाही आशीर्वाद आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Deepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार