शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार? सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान, म्हणाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 14:01 IST

Maharashtra Assembly Election 2024:

मागच्या पाच वर्षांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय उलथापालथींमुळे राज्याच्या राजकारणातील बरीच समिकरणं बदलली आहेत. दरम्यान, त्याचा प्रभाव विविध मतदारसंघांवरही पडला असून, तिथेही बदललेल्या परिस्थितीमुळे काही नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते पक्षांतर करतील, असे दावे केले जात आहेत. दरम्यान, मतदारसंघातील बदलेल्या परिस्थितीमुळे समरजित सिंह घाटगे आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे दोन प्रमुख नेते पक्षांतर करून शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना समरजित घाटगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला याबाबत माहिती नाही. समरजित यांच्याबाबतची ही माहिती मी तुमच्याचकडून ऐकतेय. पण समरजित घाटगे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. अतिशय कर्तृत्ववान नेतृत्व आहे. जीवनात त्यांनी संघर्ष केलेला आहे. अर्थातच महाराष्ट्रासाठी ते काही करू पाहत असतील, तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काही माहिती नाही. मला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे आज हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस आहे. हर्षवर्धन भाऊ तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान,  समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ३ सप्टेंबरला पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून, यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. गैबी चौकात मेळावा घेऊनच ते रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये हसन मुश्रिफ विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे