शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:09 IST

Vasantrao Deshmukh Sanjay Raut, balasaheb Thorat: जयश्री थोरात यांच्यावर टीका करण्यापूर्वी वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. कमी मतं घेणारा उमेदवार मिळावा म्हणून थोरात हे ठाकरे-राऊतांना ऑफर द्यायचे असा आरोप त्यांनी केला.

Vasantrao Deshmukh News: भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आले. वसंतराव देशमुख यांनी याच कार्यक्रमात बाळासाहेब थोरात आणि संजय राऊतांवरही टीका केली. बाळासाहेब थोरात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पाया पडतात. ते शरद पवारांचा पट्टा गळ्यात घालून फिरतात, असे वसंतराव देशमुख म्हणाले. इतकंच नाही, तर संजय राऊतांबद्दलचा एक जुना किस्सा सांगताना मी त्यांना तुम्ही सुपारी बहाद्दर आहात, असे म्हटलो होतो, असा दावाही त्यांनी या सभेत केला. 

सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंतराव देशमुख बाळासाहेब थोरातांना लक्ष्य करताना म्हणाले, "हे रोज तिकडे शरद पवारांच्या पाया पडतंय. उद्धव ठाकरेच्या पाया पडतंय. गेल्या २० वर्षापासून या तालुक्याला मी सांगतोय की, आमचा हा आमदार शरद पवारांचा गळ्यात पट्टा अडकवणारा आहे. पट्टा अडकून घेतलेला. त्याला काय म्हणतात? (गर्दीतून लोक बोलले कुत्रा) हो. तो काँग्रेसी नाहीये. त्याला काहीच घेणं नाही. त्याला फक्त शरद पवार पाहिजे", अशी टीका वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. 

उद्धव ठाकरे, संजय राऊतांना ऑफर

"गेली २०-२५ वर्षे हा माणूस उद्धव ठाकरे आणि त्यांचा संजय राऊत यांच्याशी संधान ठेवून होता. दरवेळी ऑफर द्यायचा. जो उमेदवार कमी मतं घेईल, असा उमेदवार आम्हाला द्या. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीही देतो", असा आरोप वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांवर केला.

"संजय राऊतांना म्हणालो, तुम्ही सुपारी बहाद्दर आहात" यावेळी वसंतराव देशमुख यांनी संजय राऊतांसोबतचा जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, "पाच वर्षापूर्वी आमच्या एका नातेवाईकाच्या पत्नीच्या अत्यंसंस्काराला मी गेलो होतो. ते आयएएस अधिकारी होते. त्यांच्या घरी संजय राऊत आले. त्यांना माझी ओळख करून दिली. त्यांनी (संजय राऊत) मला विचारलं की, आमच्या शिवसेनेला तिथे स्थान का मिळत नाही? मी म्हटलं तुम्हाला पैसे पाहिजे. मिस्टर संजय राऊत, तुम्ही सुपारी बहाद्दर आहात", असे सांगत देशमुखांनी थोरात आणि राऊतांवर टीका केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSanjay Rautसंजय राऊतSujay Vikheसुजय विखेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी