शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"गुंडागर्दी बस, सांगून ठेवतो तुझा हात..."; उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना जाहीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 23:22 IST

Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेची विधानसभा निवडणुकीत जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार या निवडणुकीमध्ये होत आहे. मात्र या योजनेवरुन भाजप खासदाराने केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं. १५०० रुपये घेतलेल्या महिल्या काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या असं धनंजय महाडिकांनी म्हटलं.यावरुनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडिकांना इशारा दिला आहे.

चोपडा येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानावरुन जोरदार टीका केली. लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं. धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. महिलांना पंधराशे रुपये देऊन त्यांच्यावर उपकार करताय का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

"महिलांना जे काही पंधराशे रुपये दिले जातात जणू काही त्यांच्यावर उपकार करत आहेत. कोल्हापूरचे मुन्ना महाडिक मस्ती मध्ये बोलले की ज्या महिला महाविकास आघाडीच्या सर्वांना जातात त्यांचे फोटो काढून पाठवा. तू काय करणार आहेस. माझ्या एका जरी बहिणीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना महाडिकला सांगून ठेवतो तुझा हात उखडून ठेवेल. ही गुंडागर्दी बस झाली. इथल्या सुद्धा गद्दाराला सांगतोय राहायचं तर सरळ नाही तर वाकडा करून पाठवेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक आणि गुलाबराव पाटील  यांना दिला.

काय म्हणाले धनंजय महाडिक?

"लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या. त्यांची नावे लिहून ठेवा.आपल्या शासनाचे घ्यायचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. त्यांचे फोटो आमच्याकडे द्या. त्यांची व्यवस्था करतो.  कोण जास्त बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे. आम्ही पैसे लगेच बंद करतो," असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा