शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 08:48 IST

Maharashtra Assembly Election 2024 :  डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि  नवापूर मतदारसंघातून  शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार : एकाच जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून तीन सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत, असा आगळावेगळा विक्रम नंदुरबार जिल्ह्यात घडत आहे आणि पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा हे तीन भाऊ रिंगणात आहेत. गावित कुटुंबाचे सदस्य असलेले हे भावंड म्हणजे डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित. डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि  नवापूर मतदारसंघातून  शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. 

सहा निवडणुकांमध्ये विजय, सातव्यांदा रिंगणातनंदुरबारच्या राजकारणात विजयकुमार गावित यांच्या परिवाराचे वर्चस्व आहे. स्वत: डॉ. विजयकुमार गावित हे सहा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. यंदा ते सातव्यांदा रिंगणात आहेत. काही अपवाद वगळता ते १९९५ पासून सातत्याने राज्य मंत्रिमंडळात आहेत.त्यांच्या कन्या डॉ. हीना गावित या  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत  निवडून आल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. डॉ. गावित यांनी आधी अपक्ष, नंतर तीन टर्म राष्ट्रवादी व दोन टर्म भाजपकडून उमेदवारी केली आहे. आता देखील ते भाजपचे उमेदवार आहेत.

गेल्या काही निवडणुकांचे चित्रवर्ष २००९ मध्ये त्यांचे लहान बंधू शरद गावित यांनी नवापूर मतदारसंघातून विजय मिळविला होता. समाजवादी पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला होता. नंतर ते २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार राहिले; परंतु त्यांना यश मिळू शकले नाही. यंदाही ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शहाद्यातून दुसऱ्यांदा... राजेंद्रकुमार गावित हे देखील दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शहादा मतदारसंघात यापूर्वी त्यांनी नशीब आजमावले आहे; परंतु यश मिळाले नाही. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती; परंतु त्यांना यश मिळू शकले नव्हते. आताच्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळविली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vijaykumar Gavitविजय गावीत