शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे

By यदू जोशी | Updated: October 19, 2024 11:26 IST

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी  लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत.

यदु जोशी -

मुंबई : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत ३७ विधानसभा मतदारसंघांतील विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे पाच हजारहून कमी होते. यावेळी हे मतदारसंघ कोणाला साथ देतात हे महत्त्वाचे असेल. घासून आलेल्या जागांवरील निकाल एकूणच जय-पराजयासाठी निर्णायक ठरतील.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी  लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत. गेल्यावेळी आमने-सामने असलेले दोघेही आज महायुतीत किंवा महाविकास आघाडीत आहेत. युती वा आघाडीला बंडखोरीचा फटका कमी मताधिक्याने निकाल दिलेल्या मतदारसंघात बसू शकतो. कमी फरकाने जिंकलेले आणि हरलेले दोघेही महायुतीत वा महाविकास आघाडीत आहेत, अशा ठिकाणी बंडखोरीची शक्यता अधिक असेल. 

५ उमेदवार एक हजारापेक्षाही कमी मतांनी झाले होते विजयी४ उमेदवारांना मिळाले होते एक ते दोन हजार दरम्यानचे मताधिक्य   १२ उमेदवारांचे मताधिक्य होते दोन हजार ते तीन हजार दरम्यान ८ उमेदवारांचे मताधिक्य होते तीन हजार ते चार हजार दरम्यान ८ उमेदवारांनी चार ते पाच हजार दरम्यानचे मताधिक्य घेत गाठली होती विधानसभा 

समीकरणे बदलली, चुरस वाढली सर्वात कमी मतांनी जिंकलेले शिवसेनेचे दिलीप लांडे आता शिंदेसेनेत आहेत. आता तेच शिंदेसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार असतील असे चित्र आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडून पराभूत झालेले माजी मंत्री नसीम खान (काँग्रेस) हे आता उद्धवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली तर उद्धवसेना त्यांच्या प्रचारात उतरेल. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये मोठा पेच आहे. गेल्यावेळी तिथे भाजपचे राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी ७१८ मतांनी पराभव केला होता. चंद्रिकापुरे आता अजित पवार गटात आहेत आणि ते महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे उमेदवारीवरून तिथे नाराजीनाट्य रंगू शकते. कोपरगावमध्ये जिंकलेले राष्ट्रवादीचे आशुतोष काळे (आता अजित पवार गट) आणि पराभूत झालेल्या स्नेहलता कोल्हे (भाजप) हे दोघेही आता महायुतीचा भाग आहेत. तिथेही संघर्षाची चिन्हे आहेत.माळशिरसमध्ये गेल्यावेळी भाजपचे राम सातपुते केवळ २,५९० मतांनी जिंकले होते. त्यावेळी मोहिते पाटील घराणे त्यांच्या पाठीशी होते. आता हे घराणे भाजपच्या विरोधात आणि शरद पवार यांच्यासोबत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024