शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त

By राजेश भोजेकर | Updated: November 6, 2024 08:22 IST

Maharashtra Assembly Election 2024: हेवीवेट मंत्री व नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा बल्लारपूर या  मतदारसंघात भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. सलग तीन टर्म आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते मतदारांना साद घालत आहेत.

- राजेश भोजेकरचंद्रपूर - हेवीवेट मंत्री व नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा बल्लारपूर या  मतदारसंघात भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. सलग तीन टर्म आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते मतदारांना साद घालत आहेत. त्यांची लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्याशी आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा सामना केलेले मुनगंटीवार आता नव्या उमेदीने रिंगणात उतरल्याने भाजपच्या बालेकिल्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. या मतदारसंघात काँग्रेस विचारांचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी येथील जातीय समिकरणांची गणीते काँग्रेसला नेहमीच फटका देत आली आहेत. यावेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने मागील दोन वर्षांपासून निवडणूकीच्या तयारीत असलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कायम ठेवलेली उमेदवारी मतांचे ध्रुवीकरण करण्याची चिन्हे आहेत. 

विकासकामांचा मुद्दा अधिक प्रभावीसुधीर मुनगंटीवार यांनी विकास हाच मुद्दा घेऊन प्रचाराचा रोख ठेवला आहे. तर त्यांनी केलेल्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. या मतदारसंघातील जातीय गणीते, काँग्रेसमधील पक्षांतर्गत धुसफुस हे मुद्देही प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे - महायुतीकडून या मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली सर्व प्रकारची विकास कामे मतदारांपुढे मांडली जात आहे.- महाविकास आघाडीकडून राज्यात सत्ता परिवर्तनाची लाट असल्याची बाब मतदारांच्या गळी उतरविली जात आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे  - महायुतीकडून या मतदार संघात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली सर्व प्रकारची विकास कामे मतदारांपुढे मांडली जात आहे.- महाविकास आघाडीकडून राज्यात सत्ता परिवर्तनाची लाट असल्याची बाब मतदारांच्या गळी उतरविली जात आहे. 

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसला ३५ हजारांवर मताधिक्य होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सुधीर मुनगगंटीवारांना विकासावर मते देत तिसऱ्यांदा निवडून दिले.■२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचा पराभव झाला. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ballarpur-acबल्लारपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी